Marathi News> शिक्षण
Advertisement

दहशतवादी अजफल गुरुचा मुलगा १२ परीक्षेत डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण, पाहा त्याचा निकाल

भारतीय संसदेवर हल्ला घडवून आणणारा मोहम्मद अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु यांने १२ वी परीक्षेत चांगले गुण मिळविलेत. त्याने ८८ टक्के गुण मिळविलेत.

दहशतवादी अजफल गुरुचा मुलगा १२ परीक्षेत  डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण, पाहा त्याचा निकाल

नवी दिल्ली : भारतीय संसदेवर हल्ला घडवून आणणारा मोहम्मद अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु यांने १२ वी परीक्षेत चांगले गुण मिळविलेत. त्याने ८८ टक्के गुण मिळविलेत.जम्मू-काश्मीर मंडळाच्या बारावी परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. गालिबने एकूण ५०० गुणांपैकी ४४१ गुण प्राप्त केले आहेत. त्याला पाच विषयांत 'अ' ग्रेड मिळाली आहे.

विज्ञान शाखेचा विद्यार्थी

गालिब हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्याने बारावीला भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे विषय घेतले होते. त्याने या विषयांत ८० टक्के गुण प्राप्त केलेत. तसेच त्यांने पर्यावरणशास्त्र हा विषयही घेतला होता. त्याला त्यात ९४ टक्के गुण मिळाले आहेत.

सोशल मीडियावर कौतुक

सोशल मीडियावर गालिबचे कौतुक होत आहे. गालिबने कठिण परिस्थितीत मन लावून अभ्यास केला आणि परीक्षेत चांगले गुण मिळविलेत. दरम्यान, गालिबचे वडील अफजल गुरुला संसद हल्ल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. त्याला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

१० परीक्षेतही अव्वल

जम्मू-काश्मीरच्या शाळेय दहावी परीक्षेत गालिब अव्वल होता. गालिबने दहावीत एकूण ५०० गुणांपैकी ४७४ गुण मिळविले होते.

Read More