Marathi News> Dear Zindagi
Advertisement

Death Test : तुमचा मृत्यू कधी होणार? मृत्यूची परफेक्ट भविष्यवाणी करणारी टेस्ट

तुमचा मृत्यू कधी आणि कसा होणार हे जर तुम्हाला आधीच कळलं तर? मृत्यूचा अंदाज व्यक्त करण्याबाबत संशोधन, नेमकी काय आहे ही टेस्ट

Death Test : तुमचा मृत्यू कधी होणार? मृत्यूची परफेक्ट भविष्यवाणी करणारी टेस्ट

Death Test : आपलं भविष्य (Future) जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. भविष्यात आपलं काय होणार, चांगली नोकरी मिळणार, लग्न कधी होणार किंवा नशिबात संपत्ती आहे का?, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. पण तुमचा मृत्यू कधी आणि कसा होणार हे जर तुम्हाला कोणी सांगतिलं तर. हो हे खरं आहे. इंग्लंडमधील (England) नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीने (Nottingham University) मृत्यूचा अंदाज व्यक्त करण्याबाबत संशोधन (Research) केलं आहे. या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार आहे हे कळू शकणार आहे. यासाठी 40 ते 69 वयोगटातील जवळपास 1000 जणांवर संशोधन करण्यात आलं.

ब्लड टेस्टसारखी (Blood Test) शास्त्रज्ञांनी डेथ टेस्ट (Death Test) विकसित केली आहे, ज्याद्वारे माणूस कधी मरणार आहे हे समजू शकणार आहे.  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) माध्यमातून  कोणाचा मृत्यू कधी होणार आहे हे कळू शकेल? संशोधन करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मधुमेह, ह्रदयाचे आजार असलेल्या लोकांचा समावेश करण्यात आला होता.  कोणत्या परिस्थितीत या व्यक्तींची प्रकृती गंभीर होत जाते आणि त्यांच्या मृत्यूची शक्यता कधी वाढू शकते याचा अभ्यास करण्यात आला.

तुमचा मृत्यू कळणार?

नॉटींगहॅम विद्यापीठानं डेथ प्रेडिक्शनसंबंधी ब्रिटीश नागरिकांवर चाचणी केली

40 ते 69 वयोगटातील 1000 व्यक्तींवर ही चाचणी करण्यात आली

लाईफ स्टाईल, मधुमेह, रक्तदाब अशा आजारांनी पीडित व्यक्तींवर चाचणी करण्यात आली

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राद्वारे व्यक्तींच्या आरोग्याचं मापन करण्यात आलं

कोणत्या परिस्थितीत रुग्णांची परिस्थिती गंभीर होते याचा अभ्यास करण्यात आला

अकाली मृत्यूचा ट्रेंड या टेस्टमधून संशोधकांना मिळाला

रुग्णांच्या अकाली मृत्यूचा ट्रेंड डॉक्टरांना समजला तर उपचाराची दिशा बदलता येईल

रुग्णाचा मृत्यू 2 ते 5 वर्षांच्या आत होऊ शकतो का यासंबंधी निदान करता येऊ शकतं

शारिरीक परिस्थितीनुसार व्यक्तीच्या आरोग्याचा अंदाज आणि त्यावरुन मृत्यूचा अंदाज असं हे संशोधन आहे. अर्थात हा अभ्यास आता अगदीच प्राथमिक पातळीवर आहे. यावर बरंच संशोधन होणं बाकी आहे. त्यामुळे या टेस्टबाबत अजूनही संदिग्धता कायम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून अचानक उद्भवणाऱ्या मृत्यूबद्दल माहिती मिळवता येऊ शकते, पण नैसर्गिक मृत्यूबद्दल कोणताही अंदाज व्यक्त करता येऊ शकत नाही.

Read More