Marathi News> क्रिकेट
Advertisement

मागील दोन महिन्यांपासून Dhanashree Verma गायब? शेवटची दिसलेली तेव्हा युझवेंद्रसोबत...

नेमकं सत्य काय?   

मागील दोन महिन्यांपासून Dhanashree Verma गायब? शेवटची दिसलेली तेव्हा युझवेंद्रसोबत...

Dhanashree Verma and Yuzvendra Chahal News: कलाविश्वाचं क्रिकेट जगताशी असणारं नातं कोणासाठीच नवं नाही. अशा कैक जोड्या आहेत ज्यांच्यामुळं ही दोन क्षेत्र प्रेमाच्या, मैत्रीच्या नात्यानं जोडली गेली आहेत. पण, नुकतीच या दोन्ही विश्वांना हादरवणारी एक बातमी समोर आली आहे. अर्थात या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्याता आला नसला तरीही काही धागेदोरे जोडल्यास अनपेक्षित वास्तव समोर येत आहे. 

हे वास्तव म्हणजे युट्यूबर आणि डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma ) आणि भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा. सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय असणाऱ्या युझीच्या पत्नीनं या वर्तुळात जवळपास अडीच महिन्यापासून पाऊलही टाकलं नाहीये. 

धनश्रीनं इन्स्टाग्रामवर 31 मे रोजी तिची शेवटची पोस्ट केली होती. यामध्ये ती डान्स करताना दिसलेली. तर, तिच्या त्याआधीच्या रीलमध्ये युझवेंद्रही (yuzvendra chahal) सोबत दिसत आहे. 

मे महिन्यानंतर धनश्रीचा कोणताही व्हिडीओ किंवा तिची कोणतीही पोस्ट इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेली नाही. इतकंच नव्हे, तर तिनं आता इन्स्टाग्रामवर असणाऱ्या नावातून चहल हे आडनावही हटवलं आहे. 

इथे युझी आणि धनश्रीच्या वैवाहिक नात्याला तडा गेलाय का, असे असंख्य प्रश्न नेटकरी आणि क्रीडारसिकांना पडत असतानाच या दोघांनीही सोशल मीडियाच्याच माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. 

fallbacks

इन्स्टा स्टोरीमध्ये, 'आमच्या नात्याशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. विनंती करतो, याला पूर्णविराम द्या' असं लिहिलं आणि नात्यात कोणतंही वादळ आलं नसल्याचं सांगितलं. 

Read More