Marathi News> क्रिकेट
Advertisement

मॅथ्यू हेडनने निवडली 'टीम ऑफ द टूर्नामेंट'; रोहित-कोहलीसह कोणाला मिळाले स्थान?

World Cup 2023:  हेडनने सलामीसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मासह डी कॉकची निवड केली आहे.

मॅथ्यू हेडनने निवडली 'टीम ऑफ द टूर्नामेंट'; रोहित-कोहलीसह कोणाला मिळाले स्थान?

World Cup 2023:  वर्ल्डकपमध्ये लीग स्टेजचे सामने आता संपले आहेत. लीग स्टेजच्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा 160 रन्सने पराभव केला आहे. टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. टीम इंडियाच्या रोहित शर्मा, विराट कोहलीसह इतर संघातील खेळाडू वर्ल्ड कप 2023 मध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. भारताचा विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि न्यूझीलंडचा रचिन रवींद्र यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने स्पर्धेतील संघाची निवड केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यात त्याने पाच भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे.

हेडनने सलामीसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मासह डी कॉकची निवड केली आहे. त्याने विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. न्यूझीलंडचा झंझावाती फलंदाज रचिन रवींद्रला फलंदाजीसाठी चौथा क्रमांक देण्यात आला आहे. हेडनने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला पाचव्या क्रमांकावर ठेवले आहे. या संघात त्याने हेनरिक क्लासेन आणि रवींद्र जडेजा यांचाही समावेश केला आहे. त्यांच्यासोबत मार्को जॅनसेन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि अ‍ॅडम झम्पा हे देखील संघात आहेत.

कोहलीने या विश्वचषकात 9 सामन्यात 594 धावा केल्या आहेत. डी कॉकने 9 सामन्यात 591 धावा केल्या आहेत. रचिनने 9 सामन्यात 565 धावा केल्या आहेत. रोहितने 9 सामन्यात 503 धावा केल्या आहेत. मॅक्सवेलने 7 सामन्यात 397 धावा केल्या आहेत. अ‍ॅडम झाम्पाने गोलंदाजीत कमाल दाखवली आहे. तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. झाम्पाने 9 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. बुमराहने 9 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. शमीने 5 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत.

वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. हा सामना 16 नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल.

Read More