Marathi News> क्रिकेट
Advertisement

रिसेप्शनला सूट भिरकावून नाचला विराट...

अनुष्का आणि विराटच्या मुंबईतील रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिडाविश्वातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

रिसेप्शनला सूट भिरकावून नाचला विराट...

नवी दिल्ली : अनुष्का आणि विराटच्या मुंबईतील रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिडाविश्वातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळेस दोघांचे वेस्टन स्टाईलवर सर्वांच्या नजरा खिळल्या असताना विरूष्काच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जबरदस्त डान्स 

मित्रांच्या लग्नात ही जोडी आपल्या डान्सचा जलवा दाखवतेच. पण स्वतःच्या लग्नातही या जोडीने जबरदस्त डान्स केला. यापूर्वी दिल्लीत झालेल्या रिसेप्शनमध्येही दोघांनी धमाकेदार डान्स केला होता.

विराटचा हटके अंदाज

दिल्लीत अनुष्काने तोंडात नोट पकडून डान्स केला तर मुंबईत विराट इतका जोशात होता की चक्क त्याने आपला महागडा सूट काढून भिरकावला. त्यांचा हा भांगडा अत्यंत लक्षवेधी ठऱला. पाहुया काही व्हिडिओज...

 

Read More