Marathi News> क्रिकेट
Advertisement

KL Athiya wedding : सुनील शेट्टीच्या 'या' आलिशान महालात लेक घेणार सप्तपदी; जावयासाठी केलीये खास व्यवस्था

Athiya Shetty KL Rahul : सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल याच महिन्यात (जानेवारी 2023) महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. यांच्या लग्नासाठी स्थळ ही निश्चित करण्यात आले आहे.  

KL Athiya wedding : सुनील शेट्टीच्या 'या' आलिशान महालात लेक घेणार सप्तपदी; जावयासाठी केलीये खास व्यवस्था

Athiya Shetty KL Rahul Wedding : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटचा सलामीवीर के. एल. राहुल (KL Rahul ) अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, हे दोघे लग्न (Marriage) कधी करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघही विवाहबंधनात लवकरच अडकणार असून जानेवारी 2023 या महिन्यातच दोघे लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. या दोघांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. 

जानेवारीत शाही विवाहसोहळा

केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा शाही विवाहसोहळा 21 ते 23 जानेवारी दरम्यान पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच ते लग्नपत्रिकांचं वाटप करायला सुरुवात करणार आहेत. लग्न अवघ्या काही दिवसांवर आलं असल्याने आता दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. पण अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. 

वाचा : तुमचे खाते 'या' बँकेत आहे का? RBI ने जारी केली असुरक्षित बँकाची यादी 

सुनील शेट्टीच्या बंगल्यात होणार लग्न 

अभिनेत्री अथिया शेट्टी तिचे वडील सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांच्या खंडाळा येथील बंगल्यावर लग्न करणार आहे. रिपोर्टनुसार, सुनील शेट्टी यांचा खंडाळ्यातील हिल परिसरात खूप मोठा आणि आलिशान बंगला आहे. जेथे केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे खंडाळ्यात मोठ्या थाटात लग्न करणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर लग्नासाठी फक्त जवळचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले जाईल.

20 जानेवारीला लग्न होऊ शकते

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाचे रिसेप्शन अद्याप निश्चित झालेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या स्टारचे (KL Rahul Athiya Shetty Wedding Date) लग्न या महिन्यात 20 जानेवारीच्या आसपास होऊ शकते. लग्नाच्या तारखा अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेल्या नाहीत. अशी अपेक्षा आहे की लवकरच निर्माते बॉलीवूडच्या या मोठ्या फॅट भारतीय लग्नाबाबत मोठी घोषणा करतील.

Read More