Marathi News> ब्लॉग
Advertisement

'नकोशी'ची संख्या वाढण्या ऐवजी 'नकोसा'ची संख्या वाढण्याची भीती

सद्य परिस्थितीत मुली कशा जगतायंत. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमुळे अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात उपस्थित होत आहेत. असेच काही प्रश्न झी २४ तासच्या वृत्तनिवेदिका सुवर्णा धानोरकर यांनी उपस्थित केले आहेत.

'नकोशी'ची संख्या वाढण्या ऐवजी 'नकोसा'ची संख्या वाढण्याची भीती

मुंबई : बलात्कार, विनयभंग, छेडछाड, पाठलाग करणं या सगळ्यातून मुलीची सुटका कधी होणार आहे का? गुन्हेगाराच्या कुटुंबियांचं काय? त्यांची अशा परिस्थितीत काय मानसिकता असते? कसं जगत असतील ते? हा विचार मन सुन्न करतोय. डोळ्यांच्या कडा ओलावतात. कायदा कठोर करा. आरोपीला फाशीच द्या. आरोपीला आमच्या ताब्यात द्या... सगळं मान्य. पण हे प्रकार का घडतात?

याला आपण आळा घालू शकत नाही का? 
यावर काही कायमस्वरुपी उपाय नाही का? 
अशा विकृताच्या मनात हे विचार येताच, त्याला घाम फुटायला नको का? 
असं उदाहरण कायद्यानं, प्रशासनानं घालून द्यायला नको का?
का हे पाऊल उचलतात मुलं? 
नेहमी तोच का आक्रमक होतो?
तोच का छपाक करतो?
त्यालाच इमोशन्स असतात का?
त्याचंच तिच्यावर प्रेम असतं का?
त्याला इमोशन्स कंट्रोल होत नाहीत का?
ती नाही भेटली तर त्याचंच जग उध्वस्त होतं का?
तिच्याशिवाय तो जगू शकत नाही का?
पण जोवर ती नकार देते तोवर तर तो जगतच असतो ना?
ते जगणं नसतं का?
तो श्वास घेत नसतो का?
तो जेवत नसतो का?
तो झोपत नसतो का?
तो हसत नसतो का?
मग सांगा तो जगत नसतो का?
छपाक करून त्याला सुखानं जगता येत का?
छपाक करून तो मनमोकळं हसू शकतो का?
छपाक करून तो शांत झोपू शकतो का?
छपाक करून तो श्वास घेऊ शकतो का?
छपाक करून त्याची वासना शमते का?
छपाक करून त्याचा राग शांत होतो का?
छपाक करून त्याचं प्रेम व्यक्त होतं का?
का तिच्याच आयुष्याचा कोळसा?
का तिच्याच आयुष्यचं मातेर?
का तीनंच विद्रुप व्हायचं?
का तीनंच आयसीयूमध्ये जगण्या मरण्याची लढाई लढायची?
का तीनंच विद्रुप चेहऱ्यासकट रोज तीळ तीळ मरायचं?
का तीनंच स्वतःच्या शरीराची भीती बाळगायची?
का तीनंच उसणं अवसान आणून लक्ष्मी अग्रवाल व्हायचं?
गुन्हा त्यानं करायचा आणि शिक्षा तिनं भोगायची?
किती मरणयातना सहन करत तिनं जगायचं?
का टक्केटोणपे ऐकत तिनं जगायचं?
का तीनंच सगळं सहन करायचं?
कधी संपणार हा खेळ?
कधी होणार तो शहाणा?
कधी बदलणार त्याचा बदला घेण्याचा स्वभाव?
कमी पडतोय का आपण त्याला समजून घेण्यात?
कमी पडतोय का आपण त्याला समजावून सांगण्यात?
कधी जगणार ती निर्भय होऊन?
एकाच समाजात जडणघडण होऊनही त्याच्या आणि तिच्या स्वभावात का बरं असा बदल?
तिचंही असतंच ना एखाद्यावर प्रेम?
ती पचवते ना नकार, की करते छपाक?
नाही ऐकायची का नसते त्याला सवय?
शिकवायला नको का त्याला नाही ऐकायला?
कधी थांबणार??? कधी थांबणार??? कधी थांबणार???

तो हे सगळं काही क्षणात करतो. पण त्यानंतर त्याचे कुटुंबिय सतत भीतीच्या छायेत राहतात. समाज त्वायांना सुखानं जगू देत नाही. या वाढत्या घटना पाहता उद्या 'नकोशी'ची संख्या वाढण्यापेक्षा 'नकोसा'ची संख्या वाढेल असं वाटायला लागलं आहे.

EMAIL: suvarnamdhanorkar@gmail.com
ट्विटर: @suvarnayb
फेसबूक: /suvarnamdhanorkar
इन्स्टाग्राम: /suvarnamdhanorkar
BLOG: suvarnamdhanorkar.blogspot.com

Read More