Marathi News> ब्लॉग
Advertisement

डिअर जिंदगी : बुद्धीने 'बाहेर' येण्याची गरज

गावं म्हाताऱ्या लोकांच्या एकांतपणाची संध्याकाळ झाली आहेत. मुलं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एवढी मग्न आहेत की, त्यांचे आई-वडील, त्यांच्या प्राथमिक गरजांमधून बाहेर झालेले आहेत. वाढत जाणाऱ्या वयाप्रमाणे या एकांतपणाच्या राज्यात सर्वांना प्रवेश करावा लागणार आहे. 

डिअर जिंदगी : बुद्धीने 'बाहेर' येण्याची गरज

दयाशंकर मिश्र : प्रत्येक गोष्ट करण्याआधी विचार करणे चांगली बाब आहे. निर्णय घेताना जरा डोक्याचा वापर केला, तर त्यात वाईट काहीच नाही. मात्र वाट तेथे लागते जेथे फक्त आपण बुद्धीचा उपयोग करण्यात समर्थता मानतो. प्रत्येक गोष्ट करताना आपण एवढा विचार करतो की, आपण विचार करण्याचं यंत्रच झालो आहोत, यात गणितं एवढी लावतो की, जीवन कॅलक्युलेटरच्या आकड्यांसारखं झालंय. जो आपल्या कॅलक्युलेशनमध्ये येत नाही, तो जीवनाच्या बाहेर होतो, मग तो कुणीही असू देत, यात सर्व सामिल आहेत. आईवडील या गणिताच्या फेऱ्यात येण्याची शक्यताच जास्त झाली आहे.

मित्रांना भेटणं, कुणाच्या जवळ जाऊन बोलणं, यात आपण खूप कॅलक्युलेटीव झालो आहोत. मुलं मोठी होत नाहीत, तोच ते कॅलक्युलेशनमध्ये बिझी होत जातात. आईवडिलांशी त्यांचं नातं, त्यांच्या गरजांच्या आधारावर ठरू लागलंय. तिकडे आईवडिलांचे आईवडील साठी पार करतात, तोच त्यांची मुलं प्राधान्यक्रमातून बाहेर होतात. जे दूर देशात सेटल आहेत. दूर देश तर सोडा, आपल्याचं युवकांनी, आपल्या देशात परदेश बनवून ठेवलं आहे.

मुलांसोबत ४ महिने दीर्घ सुटीवर जाणाऱ्यांच्या यादीतून, वडीलधाऱ्या मंडळींची नावं बाहेर झाली आहेत. आजचा युवक आईवडिलांना सोबत तर नेतंच नाहीत, पण त्यांच्यासोबत राहायला, भेटायला २ दिवस जाणे, कथित युवकांना वेळेअभावी जमत नाही.

डिअर जिंदगीच्या संवाद मालिकेत 'जीवन - संवाद'मध्ये यावेळी मध्यप्रदेशच्या रीवामध्ये आमची ओळख, ज्येष्ठ मंडळींच्या चौकडीशी झाली. यात एक रिडायर्ड, जे प्रिन्सिपल साहेब होते. सहज बोलताना मी त्यांना म्हटलं, कुटूंबात कोण कोण असतं. उत्तर देण्यासाठी त्यांनी थोडा वेळ घेतला. जड आवाजात ते म्हणाले, माझी ४ मुलं आहेत, त्यात ३ मुलं आणि १ मुलगी. सर्व सेटल आहेत. पण कुणालाही आमच्याकडे येण्याजाण्यास वेळ नाही. लक्षात येत नाही, प्रत्येक दिवशी आम्ही नवरा-बायको काय बोलत असतो. जीवन कसं तरी सुरू आहे. एकांतपणा, वाट पाहणं संपत नाहीय, वाट पाहणे हाच जीवनाचा भाग झाला आहे.

विकासाची पोकळ कल्पना, जीवनात मुलभूत समस्यांची कमी, बेरोजगारीमुळे गावं इतकी सुनाट, एकाकी आणि खाली झाली आहेत, की तेथे युवा, लहान मुलं यांना मोठं होण्यासाठी वाव राहिलेला नाही. गावं म्हाताऱ्या लोकांच्या एकांतपणाची संध्याकाळ झाली आहेत. मुलं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एवढी मग्न आहेत की, त्यांचे आई-वडील, त्यांच्या प्राथमिक गरजांमधून बाहेर झालेले आहेत. वाढत जाणाऱ्या वयाप्रमाणे या एकांतपणाच्या राज्यात सर्वांना प्रवेश करावा लागणार आहे. 

येथे स्वप्नांची कसली स्पर्धा आहे. महत्वाकांक्षा कसलं जहाज आहे, ज्यात त्यांच्यासाठी कोणतीच जागा नाही, ज्यांच्या खांद्यांवर पाय ठेवून आम्ही यशाच्या पायऱ्या चढलो, त्यानंतर आम्हाला 'करिअर' करता आलं आहे. आम्ही आपल्या मुलांना काय शिक्षण, आणि शिकवण देणार आहोत. ज्यात नैतिकतेसाठी जागाच नाही.

मानव आणि मानवतेपासून आम्ही स्वत: आपल्या मुलांना दूर करत आहोत. या प्रमाणे आपण मोठ्यांवर अन्याय करतोय, आणि त्यासोबत त्या जगाला थारा देत आहोत, जेथे एकांतपणा, विरह याशिवाय आपला कुणीचं मित्र नसेल.

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)

(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)

Read More