Marathi News> आषाढी एकादशी
Advertisement

ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांबाबत ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?

Ashadhi Ekadashi 2023: दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक वारीतून मार्गस्थ होतात. अशा या वारीत असणाऱ्या अश्वांचंही तितकंच महत्त्वं.... 

ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांबाबत ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?

Ashadhi Ekadashi 2023: 'काया ही पंढरी| आत्मा हा विठ्ठल...' या ओळी कानांवर पडताच डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे पंढरीचा विठुराया. संपूर्ण महाराष्ट्राचं अराध्य असणाऱ्या या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी सध्या असंख्य वारकरी मार्गस्थ होत आहेत. टप्प्याटप्प्यानं वारकरी, शेतकरी आपला प्रपंच उरकता घेत पंढरीच्या वाटेवर निघत आहेत. अशा या विठ्ठलभेटीसाठी आसुसलेल्यांच्या गर्दीत काही असेही पाहुणे नजरेस पडतात ज्यांच्याप्रती असणारं महत्त्वं पाहून अनेकांनाच अप्रूप वाटतं. त्यातलेच एक म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीसोबत वावरणारा अश्व. 

अश्वांची परंपरा 

माऊलींच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांची एक परंपरा आहे. माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालतो तो माऊलींचा अश्व. तर, जरिपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व अर्थात दुसरा अश्व. असे दोन अश्व माऊलींच्या या पालखीत असतात. या अश्वांची परंपरा अतिशय मानाची असून, ती कर्नाटकातील अंकली येथील शितोळेराजे यांच्याकडे आहे. आजच्या घडीला ही परंपरा ऊर्जितसिंहराजे शितोळे चालवत आहेत. हे दोन्ही अश्व सोहळ्यात सामील होण्यासाठी पायी अंकली येथून आळंदी येथे दाखल होतात. 

 

शितोळे घराण्याचा राजाश्रय आणि ते अश्वं... 

1832 मध्ये हैबतबाबा आरफळकर यांनी माऊलीचा पालखी सोहळा सुरू केला तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाज आरतीसाठी उपस्थिती, वारीतील न्याय निवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे असा रितीरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे 4 वाजता अश्वास निमंत्रण द्यायला चोपदार जातात आणि त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो.

हेसुद्धा वाचा : पंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान

तुम्हाला माहितीये का, 1832 मध्ये हैबतबाबा आरफळकर यांनी श्री संत ज्ञानेतश्वर माऊलींचा पालखी सोहळा सुरू केला. त्याचवेळी तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. तेव्हापासूनच शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींचा नैवेद्य, पादुकांचा मुक्काम, समाज आरतीसाठी उपस्थिती, वारीतील न्याय निवाडा हा कायम शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होत आला. किंबहुना हा रितीरिवाज कायम आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात रोज पहाटे 4 वाजता अश्वांना निमंत्रण द्यायला चोपदार येतात आणि त्यानंतर साडेपाच वाजता अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांपाशी येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. जिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो.

Read More